काल रविवार,
तसं बघितलं तर आळसाचा.. आरामाचा.. दिवस !
पण एक आवडतं काम होतं, ते म्हणजे बरका फणस फोडायचं,
मग लवकरच उठलो,. पटापट आवरून सकाळी ८ वाजताच 'ऑपरेशन' फणस पार पाडलं, आणि या सिझनचे पहिले बरके गरे हाणले !!
आणि आठ सव्वा आठला तृप्त पोटाने कामाला बसलो.
दुपारी साधारणत: २ वाजता 'आता जेवावे' ह्या विचाराने उठणार तोच दापोलीहून क्लायंटचा फोन आला..
" पटकन येवून जा" ..... चर्चा करायची आहे, म्हणजे मी रात्री मुंबईला जाईन... "
.
चला... रविवार बोंबलला असा विचार करून दापोलीला जायला गाडीला किक मारली,
आणि "पटकन" १६० किमी लांब असणाऱ्या दापोलीला दिवसा उजेडी कामावर पोचलो ते संध्याकाळी साडेपाचला !
उजेड असेतोवर काम उरकून परत निघेपर्यंत साडेसात वाजले..
आणि रत्नागिरीत पोचेपर्यंत रात्रीचे ११, मग कसलं जेवण.. एक ग्लास दुध पिवून झोपलो..
सकाळचा 'ब्रेकफास्ट' रात्री ११ पर्यंत उपयोगी पडला !!.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"आयला !!! .
अजितदादा... म्हणजे काल माझं पण एक प्रकारे "आत्मक्लेश उपोषण" झालं की राव...
चला.. भाट्याच्या खाडीचं पाणी बारामतीच्या मीठ कारखान्याला कॅनाल ने न्यायचं टेंडर पक्क ना आता ??
( १५ एप्रिल २०१३ : : अजित पवार यांच्या 'आत्मक्लेश' उपोषणानंतर.....)