संध्याकाळी ए बी पी माझा वर "शामराव कोकरे" या धनगराचं घर लुटल्याची बातमी बघितली, त्याच्या झोपडीची दुरावस्था बघितली आणि माणसाच्या नीचपणाची किळस आली,
वासोट्याच्या जंगलात गेली अनेक वर्ष एकटा 'झोपडी ठोकून रहाणारा शामराव आठवला,
वासोट्याच्या जंगलात गेली अनेक वर्ष एकटा 'झोपडी ठोकून रहाणारा शामराव आठवला,
"ए पोरानो .... ह्या वाड्याशी न थांबता कुठं निघालात? वाईच बुड टेका, ताक प्या , मग दावतो 'सरीची वाट'....
असं प्रेमाने दरडावून सांगणारा शामराव आम्हा ट्रेकर्स चा आधार !
वासोटा हे वनविभागाकडून आरक्षित जंगल म्हणून जाहीर झाल्यावर ह्या गावातली बाकीची सर्व वस्ती उठून सातारा जिल्हातल्या दुसऱ्या ठिकाणी गेली, पण टणका शामराव काही हालंला नाही...
"बापजाद्यांपासून राहिलो ते ठिकाण नाही सोडणार" असं सरळ सांगून त्याच रानात झोपडी ठोकून राहिला, झोपडी कसली, मोठ्ठा मांडवच ! सोबतीला बायको आणि तीन चार मुलं, बाकीची ३ /४ नोकरी निमित्ताने बाहेर... ..
शेजारीच ७० - ८० गुरं मावतील असा मोठा गोठा, कुडाच्या- शेणानं सारवलेल्या भिंती, सगळीकडे जाणवणारा शेणां-मुताचा वास....
शेजारीच ७० - ८० गुरं मावतील असा मोठा गोठा, कुडाच्या- शेणानं सारवलेल्या भिंती, सगळीकडे जाणवणारा शेणां-मुताचा वास....
बसायला पसरलेलं घोंगडं.. आणि प्रसन्नपणे समोर आणून ठेवलेली ताकाची मोठ्ठी घागर !! हो ... घागर !! ती मात्र चकचकीत स्टेनलेस स्टीलची ..
प्या पोटभर.. लागलं तर आणखी हाय असं सांगणारा दिलदार शामराव !!
ट्रेक संपत आलाय म्हणून उरलेला डाळ तांदुळाचा शिधा दिला तर घेणारा, पण ''पोरानो.. असतील तेवढ्या सगळ्या "माचीस" मला द्या, नायतर चूल पेटवायला चोरवण्यापर्यंत जावं लागंल" असं हक्कानं काड्यापेटी मागून घेणारा शामराव...
७० -८० गुरं हायेत, एखादं दोन तीन दिवस नाही आलं परत, की समजतो वाघरांनं नेलं" असं सहजतेनं सांगणारा शामराव...
चोरवण्यात पोचल्यावर एखाद्या ग्रुप ने ठरलेले पैसे नाही दिले तर अंगातली बंडी वर करून 'ह्या पोटाला काय घालू रे पोरां ... " असं म्हणून खपाटीला गेलेलं पोट दाखवणारा रोखठोक शामराव...
काय मिळालं असेल त्याच्या झोपड्यात चोरी करून ?
नागेश्वर - वासोटा करून कोकणात उतरणांर्`यांचा वाटाड्या म्हणून शामराव काम करतो,
नागेश्वर - वासोटा करून कोकणात उतरणांर्`यांचा वाटाड्या म्हणून शामराव काम करतो,
कठीण पण जवळच्या अशा वाटा त्याच्या पायाखालच्या.. जिल्हा सातारा असला तरी तिथून चिपळूण बाजारासाठी जवळ, म्हणून 'रेशन' साठी चिपळूण गाठणारा शामराव येताना घरचं लोणी घेऊन उतरतो, ते आधी "ऑर्डर" घेतली असते त्याला देण्यासाठी...
जाताना आठवडा- पंधरा दिवसाचं रेशन आणि पुढच्या लोण्याच्या ऑर्डर .. हाच चरितार्थ...
चिपळूण - चोरवणे बस वर आधी निरोप पाठवला तर ट्रेकर्सनां वाटाड्या म्हणून येणारा शामराव सगळ्या जंगलाचा राखणदार आहे, कोण कुठे काय तोड करतंय.. कोणत्या बाजूला जंगलतोड करणार्'यांनी गाडी रस्ता बनवलाय...अश्या बातम्या फॉरेस्ट ऑफिसरला पोचवणाऱ्या शामरावच्या झोपडीवर कोणी डल्ला मारला असेल ?
एवढ्या निर्जन ठिकाणी... जिथे जायला ( घाटावरून किंवा कोकणातून .. ) निदान ४ / ५ तास चालावं लागतं .. अश्या ठिकाणी कोणी नासधूस केली असेल ? जंगलतोड करणाऱ्या ठेकेदाराने ? ट्रेकिंगच्या नावाखाली हैदोस घालणाऱ्या एखाद्या ग्रुपने ?
कोणीही असेल पण ह्या प्रकाराने जंगलात शिल्लक असलेल्या माणुसकीवर हल्ला झालाय हे नक्की.....

त्रिविक्रम शेंड्ये
(२८ जुन २०१४ )
No comments:
Post a Comment